नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिलांनी लोकल प्रवासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. याची चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निता परदेशीसह तीन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किणीकर यांना घेरत घोषणाबाजी केली होती.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडी आणि सहकारी पक्षांचा मोर्चा पार पडला. या मोर्चासाठी मुंबई आणि उपनगरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी गेले होते. यात अंबरनाथ शहरातूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी गेले होते. अंबरनाथ स्थानकातून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी लोकलमधून जात असताना त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंबरनाथचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यात काही आक्षेपार्ह घोषणाही महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणाबाजीची चित्रफित सिमरन शेख नामक एका तरूणीने आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवला होता. ही बाब बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या एका पदाधिकाऱ्या निदर्शनास आल्याने त्याच्या वतीने अंबरनाथ पोलीसात तक्रार देण्यात आली होती. अमन शेख या तरूणाने सिमरन शेख, महिला शहर संघटक निता परदेसी आणि स्नेहल कांबळे या तीन महिला पदाधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या तीन्ही महिलांना पदाधिकार्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावून योग्य तो समज दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.
यापूर्वीही घोषणाबाजी
अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता वर्षानुवर्षे आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मेहनत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्थानिक राजकारणात सक्रीय असतात. तर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर याच डॉ. किणीकर यांना स्थानिक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी काही महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. किणीकर हे पालिकेत आले असताना त्यांना घेरून घोषणाबाजी केली होती. त्यानतंर हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे.