भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखापल्याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नुपूर शर्मा या भाजपच्या दिल्ली राज्य कार्यकारणीच्या सदस्या असून त्या भाजपच्या प्रवक्त्या देखील आहेत. २७ मे या दिवशी त्यांना ज्ञानव्यापी मशीदी प्रकरणाबाबत एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रासाठी बोलविण्यात आले होते.
त्यावेळी सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या घनटनेनंतर काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर रजा अकामदीने मुंबई येथील पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पायधुनी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील रजा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.