लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-कल्याणमध्ये महिलेवर १५ जणांचा सशस्त्र हल्ला, तीन जण गंभीर जखमी

सुहास देसाई हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांना समर्थन दिले आहे. तसेच त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष पद आहे. दोन दिवसांपूर्वी राबोडी येथे महापालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करत असताना, सुहास देसाई त्याठिकाणी आले. त्यांनी कारवाई रोखली तसेच कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केली, असे महापालिकेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case has been registered against former corporator of sharad pawar group mrj