लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष (शरद पवार गट) विक्रम खामकर यांच्याविरोधात धमकी प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार गटाचे प्रदेश पदाधिकारी नजीब मुल्ला यांचे स्वीय साहाय्यक समीर आडकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विक्रम खामकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. गुरुवारी दुपारी नजीब मुल्ला यांचे स्वीय साहाय्यक समीर आडकर हे महापालिकेजवळील कार्यालयात असताना त्यांना विक्रम खामकर यांनी फोनवरून संपर्क साधला. सुरुवातीला आडकर यांनी विक्रम यांच्या फोन घेणे टाळले. त्यानंतर काही मिनीटांनी आडकर यांनी संपर्क साधला असता, खामकर यांनी त्यांना धमकी दिली.
आणखी वाचा-तर गोर-गरीबांचे जीव वाचतील आणि पदरात पुण्य पडेल, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला
याप्रकरणी त्यांनी खामकर यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘तू आव्हाड साहेबांच्या विरोधात गेलास. तू कळव्याला राहतो, तू बाहेर कसा पडतोस ते पाहातो. महेश आहेर यांना कसे मारले ते बघितले ना, तुझी पण अशीच अवस्था करू. तुला जीवंत सोडणार नाही. अशी विक्रम यांनी धमकी दिल्याचे आडकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार, याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.