लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे : पत्नीचे बाळंतपण आणि इतर कामासाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी एका तरूणाला वेठबिगारी करावी लागल्याचा प्रकार भिवंडी येथील पडघा भागात उघडकीस आला आहे. राजेश मुकणे (२२) असे वेठबिगारी करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी वीटभट्टीचा मालक शशिकांत पाटील याच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी वीटभट्टीची पाहणी करून राजेश मुकणे याच्यासह २३ वेठबिगारींची सुटका केली आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडीतील १२ वेठबिगारींची सुटका श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर पुन्हा वेठबिगारी उघडकीस आली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा भागात राजेश मुकणे हा आदिवासी तरूण राहातो. वर्षभरापूर्वी त्याने पत्नीच्या बाळंतपणासाठी तसेच इतर कामासाठी शशिकांत पाटील याच्याकडून ५२ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर शशिकांत याने राजेशला पडघा येथील त्याच्या वीटभट्टीवर कामाला आणले. दिवाळीपूर्वी राजेश त्याच्या गावी निघून आला. परंतु आणखी ४० हजार रुपये शिल्लक असल्याचे कारण सांगत शशिकांत त्याला पुन्हा वीटभट्टीवर घेऊन जाऊ लागला. राजेशला त्याच्याकडे काम करायचे नव्हते. त्यामुळे राजेश याने त्याच्यासोबत जाण्यास विरोध केला असता, शशिकांतने त्याला मारहाण केली. तसेच त्याला, पत्नी आणि मुलासोबत पुन्हा पडघा येथे आणून त्याला वेठबिगारी करण्यास भाग पाडले.

आणखी वाचा-मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची गय नाही

याप्रकाराची माहिती श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत वीटभट्टीची पाहणी केली. त्यावेळी राजेश याच्यासह २३ जण तिथे वेठबिगारी करत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.