ठाणे : भिवंडी येथे तिहेरी तलाकचे प्रकरण उघडकीस आले आहे. एका व्यक्तीने तीन वेळा ‘तलाक’ म्हणत त्याच्या पत्नीला घराबाहेर काढले. या घटनेनंतर महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भिवंडी येथील शांतीनगर भागात पिडीत महिला तिच्या पतीसोबत वास्तव्यास होती. तिच्या पतीचे एका महिलेसोबत प्रेमप्रकरण होते. याबाबत पिडीतेला माहिती मिळाली होती. तिने या प्रकरणाबाबत पतीला विचारणा केली असता, त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली होती. ७ फेब्रुवारीला महिलेने पतीचे व्हाॅटसॲप संदेश तपासले असता, त्याचे त्या महिलेसोबत संदेश आढळून आले.

हेही वाचा…गायमुख घाट रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

याबाबत ८ फेब्रुवारीला महिलेने पुन्हा विचारणा केली. त्यामुळे तिच्या पतीने तीन वेळा तलाक म्हणत तिला घराबाहेर काढले. त्यानंतर पिडीत महिला तिच्या आई-वडिलांकडे वास्तव्यास होती. सप्टेंबर महिन्यात तिच्या पतीने त्या महिलेसोबत निकाह केल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.