प्रसिद्ध लावणी कलावंत आणि अभिनेत्री विजया पालव यांचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. इमारतीचा मालक चेतन पाटील याच्यासोबत झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चेतन पाटील याच्यासह त्याच्या कुटुंबियांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवा येथील रेल्वे स्थानक परिसरातील एका इमारतीमध्ये विजया त्यांचे पती आणि मुलासोबत राहतात. रविवारी सायंकाळी त्यांच्या घरातील स्वच्छतागृहाच्या नळाची दुरूस्ती करायची होती. त्यामुळे त्यांनी एका नळ दुरूस्त करणाऱ्याला बोलावले होते. संबंधित नळ दुरूस्त करणारा त्याठिकाणी आला असता चेतन पाटील याने त्यास अडविले. याचा जाब विचारण्यासाठी विजया आल्या असता चेतन याने त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्यांचे डोके भिंतीवर आपटले. तसंच चेतनची पत्नी, आई, भाऊ आणि इतर दोघांनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. रात्री उशिरा विजया यांनी उपचार केल्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered after lavni dancer vijaya palav beaten in thane sgy