ठाणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंगप्रकरणी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याच्या तसेच त्याचा बदला घेण्याच्या उद्देशातून खोटा गुन्ह्यात अडकवून मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणात आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रार महिलेने केली आहे. भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमधील वाढत्या चोऱ्यांनी दुकानदार त्रस्त

nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
Naigaon shooting assault incident news in marathi
नायगाव गोळीबार आणि हल्ला प्रकरण : एलएलपी गटाच्या ३० जणांविरोधातही गुन्हे
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
गँगस्टर डीके रावसह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा, गुन्हे शाखेची कारवाई

या संदर्भात रिदा रशीद आणि माजी नगरसेवक राजन किणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हाड यांच्यासह सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल केलेला विनयभंगचा गुन्हा मागे घेण्याच्या आणि त्याचा बदला घेण्याच्या उद्देशातून खोटा गुन्हा दाखल करून कट रचला, खोटे पुरावे देऊन पोलिस आणि न्यायालयाची दिशाभुल केली. न्यायालयात खोटी याचिका दाखल केली. खोट्या चित्रफिती तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या, असा आरोप रिदा यांनी केला. खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे कौटुंबिक वाद होऊन परिवाराचे मानसिक स्वास्थ बिघडले आणि त्याचबरोबर परिवाराला मानसिक त्रास झाला, असा आरोपही त्यांनी केला आहे. यातील, मुंब्यातील इस्टेट एजंट शबाना सोंधी (४०) हिला पोलिसांनी अटक केली असुन इतर आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Story img Loader