ठाणे : एका प्रकरणात धमकी देऊन खंडणीची वसूल केल्याच्या आरोपावरून राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात संजय पांडे अंतरिम जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी पांडे यांना वागळे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेतला. सुमारे साडे तीन तास जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणातील तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून ते मुंबई शहरात राहतात. त्यांच्यासह काही विकासकांनी मिरा भाईंदरमध्ये युएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळविली. या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती, असा आरोप आहे. याप्रकरणी २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास २०२१ मध्ये पुन्हा सुरू करून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप तक्रारदार बांधकाम व्यवसायिकाने केला होता.

हेही वाचा >>>नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश

याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात ठाणेनगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी या प्रकरणाच्या तपासासाठी पांडे यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने वागळे विभागाच्या कार्यालयात बोलाविले होते. गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी संजय पांडे यांचा जबाब नोंदवून घेतला. सुमारे साडेतीन तास जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

जबाब नोंदविण्यासाठी जाण्यापूर्वी संजय पांडे यांना विचारले असता, पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहिती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. परंतु जबाब नोंदवून आल्यानंतर त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हे प्रकरणात संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास सुरू राहणार आहे. – अमरसिंह जाधव, उपायुक्त, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा.