ठाणे : पालघर येथील एका व्यवसायिकाला वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) दंड कमी करुन देण्यासाठी त्यांच्याकडून १५ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जीएसटी विभागाचे उपायुक्त तात्यासाहेब ढेरे आणि एका खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले आहे. तर ढेरे यांचा शोध सुरू आहे. पालघर येथे ५२ वर्षीय व्यवसायिकाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंच्या खरेदी विक्री बाबत त्यांना दंडासह वस्तू आणि सेवा कर आकारण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ही रक्कम कमी करुन देण्यासाठी एकनाथ पेडणेकर या खासगी व्यक्तीने उपायुक्त तात्यासाहेब ढेरे यांच्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी व्यवसायिकाकडे केली होती. याप्रकरणी २८ फेब्रुवारीला व्यवसायिकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. रविवारी पेडणेकर याने व्यवसायिकाला १५ लाख रुपये घेऊन अंधेरी येथील चीमतपाडा येथील एका उपाहारगृहात बोलावले. त्यानुसार, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याठिकाणी सापळा रचला. तेथे १५ लाख रुपयांची लाच घेताना पेडणेकर याला पथकाने ताब्यात घेतले. तर ढेरे यांचा पोलीस पथकाकडून शोध शुरू आहे.