कल्याण – रेल्वे सुरक्षा दलात कर्तव्यावर असलेल्या एका जवानाने डोंबिवलीतील एका महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या बरोबर वेळोवेळी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानाने महिलेश लग्न करण्यास नकार दिला आणि बरबाद करून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात पीडीत महिलेने तक्रार केली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासणी अहवाल नोंदवून घेतला आहे.सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पीडित महिलेवर रेल्वे सुरक्षा जवानाने लैंगिक अत्याचार केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीस वर्षाची पीडित महिला अविवाहित आहे. ती डोंबिवलीत राहते. ती नोकरी करते. गुन्हा दाखल जवान रेल्वे सुरक्षा बळात नोकरीला आहे. कल्याण, डोंबिवलीतील विविध ठिकाणी या जवानाने पीडितेला नेऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले.पीडित महिला लग्नासाठी जवानाच्या पाठीमागे तगादा लावत होती. जवानाने त्यास नंतर नकार दिला. तसेच पीडित महिलेला बरबाद करण्याची धमकी दिली.

हेही वाचा >>>डोंबिवली गोळवलीतील बेकायदा शुभारंभ हाॅल भुईसपाट; उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिकेच्या आय प्रभागाची कारवाई

हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तेथून ही तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आश्लेषा घाटगे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against rpf jawan who cheated woman in dombivli on the promise of marriage amy