ठाणे : कळवा, मुंब्रा, शीळफाटा भागात वीज चोरी करणाऱ्यांविरोधात टोरंट पाॅवर कंपनीने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. कल्याण-शीळ मार्गावरील देसाई गावातील ३७ लाख रुपयांहून अधिक रकमेची वीज चोरी झाली असल्याची समोर आले आहे. याप्रकरणी १० जणांविरोधात शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळवा, मुंब्रा, शीळफाटा भागात टोरंट पाॅवर कंपनीकडून वीज वितरण केले जात आहे. शीळ-फाटा येथील देसाई गावामध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती टोरंट पाॅवर कंपनीला मिळाली होती. त्यानुसार कंपनीने पाहणी केली असता, ३७ लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी याप्रकरणात शीळ-डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वीज चोरी आणि विद्युत मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत विजेचा लपंडाव

हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत कामगारांकडून चोरी

विद्युत कायदा अधिनियम कलम १३५ व १३८ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून वीज चोरी हा गुन्हा आहे. या प्रकरणी दंड व तीन वर्षांपर्यत शिक्षा होऊ शकते. ज्या नागरिकांनी अनधिकृतपणे वीज घेतली असेल किंवा आकडे टाकून वीज चोरी करत असेल तर, ते बंद करून अधिकृत वीज पुरवठा करून घ्यावा असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.