लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरील एका इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या रहिवाशाने मांजराला मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता खिडकीतून बाहेर फेकले. जमिनीवर पडून गंभीर दुखापत झाल्याने मांजराचा (बोका) जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने प्राणीमित्रांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

९० फुटी रस्त्यावरील डीएनएस बँकेजवळील सर्वोदय मंगल सोसायटीच्या इमारत क्रमांक दोनजवळ हा प्रकार घडला आहे. हा प्रकार सोसायटीमधील नक्की कोणत्या सदस्याने केला आहे याविषयी सोसायटीतील इतर सदस्य उघडपणे बोलत नाहीत.

हेही वाचा… ‘एस.आर.टी.’ तंत्रज्ञानातील भात लागवडीला खेकड्यांचा धोका

मांजराला वरुन फेकून त्याच्या मरणाला कारणीभूत ठरल्याने डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्त्या रेखा रेडकर यांनी अज्ञात व्यक्ति विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायद्याने सर्वोदय मंगल सोसायटीतील इमारत दोन मधील अज्ञात रहिवाशाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. बाकले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cat dies after being thrown from second floor of building in thakurli in dombivali dvr
Show comments