ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रीहावी आणि शहरातील हालचालींवर बारीक नजर रीहावी, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरात सीसीट१व्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई-नाशिक महामार्गावरील चार महत्त्वाच्या जंक्शनवर पहिल्या टप्प्यात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यास अंतिम मान्यता मिळताच पुढील दोन महिन्यांत हे सीसीटीव्ही कार्यान्वित होतील, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ठाणे शहरातील तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी, तत्त्वज्ञान विद्यापीठ, हायपर सिटी या जंक्शनसह शहरातील काही महत्त्वाचे रस्ते आणि चौकात सुमारे ४० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी महापालिकेपुढे मांडला होता. पालिकेनेही त्यास अनुकूलता दर्शवत यंदाच्या अर्थसंकल्पात ‘स्मार्ट सिटी सव्‍‌र्हेलन्स’ योजनेअंतर्गत शहरात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर नाका, तीन हात नाका, नितीन कंपनी तसेच कॅडबरी या चार महत्त्वाच्या जंक्शनवर १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ५९ लाख रुपये खर्च येणार असून या कामाच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया लवकर उरकून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
बेशिस्तीला पायबंद
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दृश्ये टिपणारी ‘व्हिडीओ वॉल’ वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात बसविण्यात येईल. परदेशात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे दंड ठोठावण्यात येतो. त्याच धर्तीवर ही योजना राबवण्याचा वाहतूक पोलिसांचा मानस आहे.वडाळा ते कासारवडवली

 

Story img Loader