डोंबिवली शहर परिसर, रेल्वे स्थानक भागात भुरट्या चोऱ्या वाढल्यामुळे आणि अनेक वेळा फेरीवाले स्कायवाॅकवर व्यवसाय करत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. चोवीस तास स्कायवाॅकवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याने याठिकाणच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.डोंबिवली शहरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणे, हातामधील मोबाईल हिसकावणे. सकाळीच कामावर जाण्याच्या गडबडीत असलेल्या प्रवाशांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जाणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक भागात वाढले आहेत. हे गु्न्हे करणाऱ्यांवर नजर असावी आणि त्यांची वेळीच ओळख पटवून त्यांना पकडणे पोलिसांना सोपे जावे म्हणून प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा