धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना होणारे अपघात आणि अशा अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढती संख्या या दोन्ही बाबी रेल्वे प्रशासनासाठी चिंताजनक अशाच आहेत. यासाठीच रेल्वेकडून वारंवार धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन केलं जातं. अशा आवाहनांकडे रेल्वेची नेहमीची एखादी अनाऊन्समेंट असल्यासारखं दुर्लक्ष करण्याचीच वृत्ती वाढत असताना त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचं धक्कादायक वास्तव दर्शवणारी घटना नुकतीच कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेच्या सीसीटीव्ही फूटेजचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही घटना १८ एप्रिल अर्थात सोमवारी दुपारी १२च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवर घडल्याचं सीसीटीव्हीमध्ये नोंद झालेल्या वेळेवरून दिसून येत आहे. प्लॅटफॉर्मच्या कसाऱ्याकडच्या दिशेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार रेकॉर्ड झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

एक धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असलेला एक प्रवासी तोल जाऊन एक्सप्रेस व फलाटाच्या मध्ये आल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुपारी १२च्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर चारवर गोदान एक्स्प्रेस आली. प्लॅटफॉर्मवरून एक्स्प्रेस निघताच एक प्रवासी धावत जाऊन ती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन खाली पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

एमएसएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण!

खाली पडलेल्या या व्यक्तीने दरवाजा एका हाताने धरलेला होता. काही अंतरावर तो ट्रेनसोबत फरफटत गेला. मात्र, शेवटी त्याचा हात सुटला आणि तो दरवाजा आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत जाऊ लागला. या व्यक्तीचं डोकं आधी त्या जागेत जाऊ लागलं. मात्र, वेळीच तिथे एमएसएफचे जवान रोशन जाधव आणि सुरक्षा बलातील एका महिला कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीला पायाला धरून खेचून बाहेर काढलं. त्यामुळे या प्रवाशाचा जीव वाचला.

सुदैवाने या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देण्यात आलं. रोशन जाधव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधान व धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.