देवदर्शनाच्या बहाण्याने मंदिरात येऊन एका चोरट्याने देवाच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी काही तासांतच या चोरट्याला जेरबंद केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील सेक्शन ३० मध्ये गुरुनानक दरबार आहे. या दरबारात शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एक व्यक्ती दर्शनाच्या नावाखाली शिरला. या व्यक्तीने सर्वप्रथम मंदिरात देवाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली. मुख्य देवापासून शेजारी असलेल्या देवांच्या दर्शनाच्या बहाण्याने या व्यक्तीने चांदीच्या पादुका उचलून रुमालात गुंडाळल्या. त्यानंतर पुन्हा देवाचे दर्शन घेत असल्याचे भासवत देवापुढे नमस्कार केला. पुढे मंदिरात बसलेल्या व्यक्तीला चुकवत त्याने मंदिरातून पळ काढला.

काही वेळाने पादुका जागेवर नसल्याची बाब मंदिराच्या सेवेकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले. त्यावेळी मंदिरात लाल रंगाचा शर्ट घालून आलेला इसमच चोर असल्याचे समोर आले. मंदिर प्रशासनाने याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही तासातच या चोरट्याला शोधत त्याला बेड्या ठोकल्या. नितीन पाईकराव असे या ३२ वर्षीय चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरलेल्या पादुकाही हस्तगत करण्यात आल्या आहेत.