ठाणे शहरातील गृहसंकुलांना ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ योजनेपाठोपाठ आता ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे सूतोवाच ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे पोलिसांच्या कार्यक्रमात बोलताना केले.
या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला पायबंद बसून गुन्ह्य़ांच्या संख्येत घट होईल, असा दावा करत त्यांनी गृहसंकुलांकरिता हा नवा नियम लागू करण्यासाठी आग्रही असल्याचे या वेळी स्पष्ट केले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नवीन अद्ययावत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात नागरिकांच्या मदतीकरिता ‘होप’ या ‘अ‍ॅप्लिकेशन’चेही अनावरण करण्यात आले. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण उपस्थित होते. ठाणे शहरातील नव्या गृहसंकुलांना महापालिकेने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ योजना सक्तीची केली असून ही योजना राबवली नाही तर महापालिका इमारतींना ‘रहिवास प्रमाणपत्र’ देत नाही. त्याच धर्तीवर ठाणे शहरातील गृहसंकुलांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. कॅमेऱ्यामध्ये आपले चित्रीकरण होईल आणि आपण पकडले जाऊ, अशी भीती प्रत्येक गुन्हेगारामध्ये निर्माण होईल. त्यामुळे गुन्ह्य़ांच्या संख्येत घट होईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला. आमदार निधीतून मतदारसंघात कॅमेरे बसविण्याकरिता कायद्यामध्ये दुरुस्ती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्याचे पोलीस बळ अपुरे असून ठाणे, घोडबंदर, बदलापूर आणि अंबरनाथ आदी भागांत मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा