डोंबिवली – राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर डोंबिवली, कल्याणमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

कालपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार धोक्याच्या पातळीवर असल्याची, सरकार गडगडण्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे शिंदे समर्थक शिवसैनिकांमध्ये स्थानिक पातळीवर अस्वस्थता होती. आज दुपारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील सरकार स्थिर असल्याचे जाहीर होताच, डोंबिवलीत शिवसैनिकांनी मध्यवर्ति शाखेत जमून आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तलावांचा कायपालट? २८ कोटींचा प्रस्ताव तयार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा, समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या. शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, प्रकाश माने आणि समर्थक शिवसैनिक यावेळी मो्ठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader