अस्सल डोंबिवलीकर
सध्या सुरू असलेल्या ‘अस्मिता’ या भूमिकेमुळे प्रेक्षकांसमोर असलेल्या अभिनेत्री मयुरी वाघ हिने लहानपणापासून नाटकातून कामे केली आहेत. बालकलाकार म्हणून ‘उठी उठी गोपाळा’ हे नाटक केले असून कॉलेजमध्ये शिकत असतानाच ‘मांगल्याचे लेणे’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले आहे. त्यानंतर ‘वचन दिले मी तुला’ या मालिकेद्वारे मयुरीने आपला मोर्चा छोटय़ा पडद्याकडे वळविला. अभिनयाबरोबरच भरतनाटय़म विशारद असलेली मयुरी वाघ मूळची डोंबिवलीच्या टिळकनगरची राहणारी आहे. भरतनाटय़म विशारद असल्यामुळे अभिनयाबरोबरच अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्य तिने नृत्याविष्कारही सादर केले आहेत.
आवडते मराठी चित्रपट – ‘अशी ही बनवाबनवी’, ‘दुनियादारी’, ‘किल्ला’, ‘एलिझाबेथ एकादशी’.
आवडते हिंदी चित्रपट – ‘अंदाज अपना अपना’, माधुरी दीक्षितचे सगळे चित्रपट.
आवडती नाटकं – ‘त्या तिघांची गोष्ट’.
आवडते दिग्दर्शक – मालिकांचे संगीत कुलकर्णी. संजय जाधव, सतीश राजवाडे, आशुतोष गोवारीकर या    दिग्दर्शकांसोबत काम करण्याची खूप इच्छा आहे.
आवडलेल्या मालिका – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’.
आवडलेल्या भूमिका – ‘बर्फी’ चित्रपटातील रणबीरची भूमिका, ‘बाहुबली’मधील बाहुबलीची भूमिका,  उंबरठा’मधील स्मिता पाटील यांची भूमिका.
आवडते सहकलावंत – सुलभा देशपांडे, पीयूष रानडे, राजू चावला.
आवडते लेखक/नाटककार – मालिकांसाठी मनस्विनी लता रवींद्र, मधुगंधा कुलकर्णी, रोहिणी निनावे;  नाटकांसाठी विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे
आवडलेली पुस्तके – ‘राधेय’, सिडनी शेल्डन, रत्नाकर मतकरी, पु. ल. देशपांडे यांची पुस्तके.
आवडता खाद्यपदार्थ – आईच्या हातचे पोहे आणि दडपे पोहे.
आवडता फूडजॉइण्ट – डोंबिवलीत ‘प्रजापतीची पाणीपुरी’.
कस्तुरी प्लाझाजवळचा दाबेलीवाला.
आवडते हॉटेल – गोविंदाश्रम. खूप जुने हॉटेल आहे. तिथली पावभाजी खूप प्रसिद्ध आहे.
ठाणे जिल्हय़ातील आवडता पिकनिक स्पॉट – येऊर, वज्रेश्वरी.
डोंबिवलीविषयी थोडेसे – माझा जन्म डोंबिवली पूर्व येथील टिळकनगरचा आहे. टिळकनगर हायस्कूलमध्येच शिकले. सगळे बालपण टिळकनगर परिसरात गेले आहे. नंतर आम्ही एमआयडीसी परिसरात राहायला गेलो. असंख्य मित्र-मैत्रिणी आणि जवळचे नातेवाईक डोंबिवलीत राहतात. त्याचबरोबर करिअरची सुरुवात डोंबिवलीतच झाली आहे. त्यामुळे आपसूकच मी अस्सल डोंबिवलीकर आहे, असे म्हटले तरी आवडेल. डोंबिवलीतले मराठमोळं वातावरण, फडके रोडवर साजरे होणारे सण, स्वागतयात्रा, या सगळ्या गोष्टींमुळे डोंबिवली आवडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा