ठाणे महापालिकेचा प्रस्ताव; नसबंदी, आधारगृह आणि स्मशानभूमीचीही सुविधा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे महापालिका क्षेत्रातील पाळीव तसेच भटक्या प्राण्यांवरील उपचार, नसबंदीकरिता रुग्णालयाची उभारणी करतानाच आधारगृह, स्मशानभूमी आणि उद्यानाची व्यवस्था असलेले ‘पेट पार्क’ उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. घोडबंदर येथील कावेसर भागातील उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील पाच हजार चौरस मीटर जागेवर हे ‘पेट पार्क’ वसवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या सर्वसाधारण सभेत त्याला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेच्या केंद्रामध्ये भटक्या श्वानांवर नसबंदी आणि उपचार करण्यात येतात. तीन हजार चौरस फूट जागेमध्ये हे केंद्र उभारण्यात आलेले असून त्या ठिकाणी दोन शस्त्रक्रिया विभाग, ७४ कॅनल्स, कार्यालय, किचन आणि शौचालये अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, प्राण्यांवर उपचार तसेच नसबंदी करण्यासाठी ही जागा अपुरी पडत असून त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य विभागाने शहर विकास विभागाकडे केली होती. त्यानुसार आता प्राण्यांची नसबंदी, उपचार, आधारगृहे (कोंडवाडा), शवदहनवाहिनी आणि पेट पार्क अशा सुविधा निर्माण करून देण्यासाठी शहर विकास विभागाने कावेसर भागातील जागा निश्चित केली आहे.
घोडबंदर येथील कावेसर भागातील सव्र्हे क्रमांक १४४/ ५ आणि १४४/६ या भूखंडावर उद्यानाचे आरक्षण आहे. या आरक्षणापैकी ११८०० चौ.मी. इतके क्षेत्र महापालिकेच्या नावावर झालेले आहे. ही जागा निवासी वस्तीपासून दूर असून त्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे या जागेपैकी पाच हजार चौ. मी. जागेवर पेट पार्क आणि प्राण्यांवरील उपचार सुविधा निर्माण करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
खासगी संस्थेची नेमणूक
ठाणे महापालिका खासगी संस्थेच्या माध्यमातून पेट पार्क आणि प्राण्यांवरील उपचार सुविधा निर्माण करणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावामध्ये अशा संस्थेची नेमणूक करण्यासाठी स्वारस्य देकार मागविणे आणि त्यासाठी अटी-शर्ती निश्चित करण्यासाठी आयुक्तांना अधिकार देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.