ठाणे : ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या १२ हजार २०० कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पास केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. सहा डब्यांच्या मेट्रोवर अखेर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले असून यामुळे गेले अनेक वर्षे कागदावर असलेला हा बहुचर्चित प्रकल्प आता मार्गी लागला आहे. या मेट्रोची सुरवात २०२९ पर्यंत होणार असून या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गतिमान होणार आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत वडाळा-घाटकोपर ते गायमुख या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. कापुरबावडी येथून भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. याशिवाय, ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने अंतर्गत मेट्रो प्रकल्प उभारणीचा निर्णय होता. ठाणे शहरातून जाणाऱ्या दोन्ही मुख्य मेट्रो मार्गांना पुरक ठरेल असा अंतर्गत मेट्रोचा आराखडा महापालिकेने महामेट्रोच्या (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मदतीने तयार केला होता. या प्रकल्पासाठी १२ हजार २०० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. हा प्रकल्प ठाणे महापालिकेने राज्य शासनाची मंजुरी घेऊन केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. या प्रस्तावास अखेर केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली.
सहा डब्यांच्या मेट्रो
ठाणे शहरातील अंतर्गत भागासाठी पालिकेने सहा डब्यांची मेट्रो प्रकल्पाची आखणी केली होती. परंतु मोठ्या शहरांमध्ये सहा डब्यांची मेट्रो तीन मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येते. यामुळे ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो दीड मिनिटांच्या अंतराने चालवावी अशी सूचना केंद्राने केली होती. दरम्यान ठाणे शहराचा वाढता आवाका लक्षात घेता ही मेट्रो सहा डब्यांची हवी असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला होता. या संदर्भात त्यांनी गेल्या वर्षी तत्कालीन केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. या भेटीत ठाणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प सहा डब्यांचा असायला हवा अशी भूमीका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. तसेच सहा डब्यांच्या मेट्रोची गरज का आहे, हेही त्यांनी पटवून दिले होते. त्यानंतर केंद्राकडून या प्रस्तावाबाबत विचार सुरू असतानाच, गुरुवारी केंद्र सरकारने या प्रकल्पास मान्यता दिली. या प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शहरे विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले आहेत.
असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प
एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून ३ किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत. अंदाजे ७.६१ लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार असून २०२९ पर्यंत मेट्रोची सुरुवात होईल. ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार असल्याने प्रवाशांचा गतिमान आणि सुरक्षित प्रवास होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणेकरांसाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना असे पूरक निर्णय घेत असतील तर काय चमत्कार होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र