मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मंगळवारी ‘सुट्टीच्या वेळापत्रका’चा फटका सहन करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने रेल्वेने मंगळवारी सुट्टीचे वेळापत्रक राबवून सकाळच्या गाडय़ांची संख्या कमी केली. मात्र, सुट्टी नसलेल्या खासगी कार्यालयांतील नोकरदारांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे सकाळी ६ ते ८ या कालावधीत ठाणे रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांची संख्या निम्म्याने घटत असल्याचे कारण देत रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी करण्यात येते. आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारीही रेल्वेने हे वेळापत्रक राबवले. त्यामुळे सकाळी सहा ते आठ या कालावधीत लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी होती. त्यातच अनेक अर्धधिम्या लोकल रद्द करण्यात आल्याने दिवा, कळवा, मुंब्रा येथील प्रवाशांना धिम्या लोकलनेच प्रवास करावा लागला. परिणामी ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा