लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यानच्या अपमार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने अप मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि सकाळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवासी खोळंबले आहेत.

सोमवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान अप मार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे त्याच्यामागे असलेल्या लोकल गाड्या खोळंबल्या. अप मार्गावरील लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस सेवांची वाहतूक कर्जत ते बदलापूरच्या दरम्यान पूर्णपणे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे एक पर्यायी इंजिन बदलापूरकडे पाठवले जात असून सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

आणखी वाचा-पहिल्याच पावसात शिळफाटा रस्त्यावर वाहन कोंडी

मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे .आधीच मेल एक्सप्रेस आणि मालगाडी यांना प्रथम प्राधान्य दिल्याने लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडते आहे. परिणामी चाकरमान्यांना दररोज कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे आधीच प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यात अशा बिघाड झाल्याने त्यात भर पडली आहे.

Story img Loader