ठाणे : मध्य रेल्वे मार्गिकेवर उपनगरीय रेल्वे गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय मोटारमनला आल्याने कल्याणच्या दिशेला जाणारी रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती. त्याचा परिणाम बुधवारी रात्री मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर बसला. मुंबईहून कल्याणच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या धिम्या रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे रात्री कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाण्यात महापालिकेच्या वतीने मोफत फिरता दवाखाना

मुंबईहून सुटलेली धिम्या गतीची रेल्वेगाडी टिटवाळाच्या दिशेने जात होती. ही रेल्वेगाडी रात्री ९.२० वाजता मुंब्रा रेल्वे स्थानकात आली असता, रेल्वेगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय मोटारमनला आला. त्यामुळे रेल्वेगाडी मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. त्याचा परिणाम डोंबिवली, कल्याणच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्वच धिम्या गतीच्या रेल्वे वाहतूकीवर झाला. रेल्वेगाड्या एकामागे एक उभ्या होत्या. ठाणे, घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेगाड्यांमध्ये उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हा झाले. सुमारे २० मिनीटे रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर कोणताही बिघाड रेल्वेगाडीत आढळून आला नाही. त्यामुळे रेल्वेगाडी पुढे रवाना करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत रेल्वेची वाहतूक विस्कळीत असल्याचे चित्र होते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway disturbed due to technical problems at mumbra zws
Show comments