दिवाळीनंतर पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ – कर्जत मार्गावरील रेल्वे सेवा काहीशा उशीराने धावत आहेत. सकाळी सीएसएमटीहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. सकाळी सहाच्या सुमारास सीएसएमटीहून कर्जतकडे निघालेल्या कर्जत लोकलमध्ये सव्वा सातच्या सुमारास बिघाड झाला असल्याची माहिती आहे.

बिघाड झाल्यानंतर काही मिनीटातच रेल्वे कर्मचारी हे लोकलच्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी बिघाड दूर केला, लोकल पूर्ववत सुरु झाली. मात्र या बिघाडामुळे सकाळच्या सुमारास बदलापूर, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाड्या तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्या या रखडल्या. यामुळे याचा परिणाम रेल्वे वाहतुकीच्या वेळापत्रकावर झाला असून अंबरनाथ-कर्जत दरम्यान आता रेल्वे सेवा काहीशी विलंबाने सुरु आहे.

Story img Loader