मुंबईची लाईफलाईन असं लोकल ट्रेनला म्हटलं जातं. रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकलचं वेळापत्रक कोलमडलं की मुंबईकरांची, चाकरमान्यांची पुढे सगळीच कामं रखडतात. मंगळवारी सकाळी असाच दिवस उजाडला. सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे सकाळीच कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे, चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ व ७ च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल अर्धातास उशिराने धावत आहेत. परिणामी कल्याण आणि त्यापुढच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकावर बिघाड

कल्याण स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी कल्याण स्टेशनवर झाली आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली आणि ठाणे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वे कोलमडली. मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. खासकरुन कल्याणच्या पुढून येणाऱ्या प्रवाशांना जास्त मनस्ताप झाला. त्यांना ठरलेल्या वेळेत कार्यालय गाठता आलं नाही.

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका