मुंबईची लाईफलाईन असं लोकल ट्रेनला म्हटलं जातं. रोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. लोकलचं वेळापत्रक कोलमडलं की मुंबईकरांची, चाकरमान्यांची पुढे सगळीच कामं रखडतात. मंगळवारी सकाळी असाच दिवस उजाडला. सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे सकाळीच कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे, चाकरमान्यांचे हाल होत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ व ७ च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल अर्धातास उशिराने धावत आहेत. परिणामी कल्याण आणि त्यापुढच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in