ठाणे : बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी ठाण्यात उमटले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांची गद्दार असा उल्लेख करत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “साहेब म्हणतात… माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागायची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल” अशी टीका भुजबळ यांनी केली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी

हेही वाचा >>> डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील सततच्या कोंडीने प्रवासी हैराण

भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रीपद दिले. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवताचा असा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशाराही देसाई यांनी यावेळी दिला.