लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : रेल्वे स्थानकातून बुधवारी सायंकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास कर्जत, बदलापूरसाठी रवाना होणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला. यामुळे सायंकाळी कामावरून परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले.
ठाणे रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक तीन वरून बदलापूर आणि कर्जत साठी लोकल गाड्या रवाना होतात. बदलापूर करिता सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी लोकल गाडी रवाना होते. तर ८ वाजून ५ मिनिटांनी कर्जत लोकल रवाना होते. मात्र कर्जत लोकलच्या वेळेत अचानक बदलापूर लोकल लावण्यात आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.
आणखी वाचा-ठाणे, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची चार कोटीची फसवणूक
तसेच कर्जतला जाणारी लोकल ८ वाजून १८ मिनिटांनी ठाणे स्थानकात दाखल झाली. यापूर्वी एक लोकल गाडी कारशेड लावण्यात आली होती. या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक चाचणी करण्यात येणार असल्याने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र नोकरदार घरी जाण्याच्या वेळेत लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात अचानक झालेल्या बदलामुळे नोकरदार वर्गाचे हाल झाले.