लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : आयोध्येत २२ जानेवारीली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिवसेना, भाजप आणि संस्थांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात राम कथा,पालखी मिरवणुका, रामायण महोत्सव, तलाव परिसरात महाआरती, व्याख्यान, रामाच्या जीवन प्रवासावर आधारित लेझर शो, अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात आठवडाभर रामाचा जप होणार आहे. तसेच विविध संस्थांकडून दिपोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे.

tourism mahabaleshwar news in marathi
महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Vasant Panchami 2025
Vasant Panchami 2025: वसंत पंचमीच्या दिवशी करा या श्लोक आणि मंत्राचा जप, माता सरस्वतीची होईल कृपा, प्रत्येक कामात मिळेल यश
In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप

आयोध्येत २२ जानेवारीली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात रामाचा जागर सुरू झाला असून ठाणे जिल्ह्यातही असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. ठाणे शहरातील राम मंदीराची प्रतिकृती असलेला रथ गृहसंकुले तसेच परिसरात नेऊन नागरिकांना अक्षतांचे वाटप करण्यात येत आहे. या रथाद्वारे घोडबंदर भागातील १८० गृहसंकुलांमधील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना अक्षता वाटप करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ठाणे, घोडबंदर तसेच विविध भागात राम कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर अनेक संस्थांकडून दिपोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे. ठाण्यात २० ते २२ जानेवारी या काळावधीत रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रदेश भाजप प्रवक्ते सुजय पतकी यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर करून रामाच्या जीवनप्रवासावर आधारीत रांगोळ्या या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. या महोत्सवात ५०० वर्षांचा मंदिराचा प्रवास चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. तसेच कारसेवक हुतात्मा स्तंभ उभारला जाणार आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील भाजप नेते विकास म्हात्रेंचा राजीनामा, विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची खंत

शालेय विद्यार्थ्यांची श्रीराम जीवनातील विविध प्रसगांवर चित्र कला स्पर्धा होणार आहे. २२ जानेवारीला भाजपा ठाणे शहरतर्फे मासुंदा तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर १०० ढोल व ३० ताशांसह होणाऱ्या महावादनाच्या कार्यक्रमातून श्री रामाला वंदन केले जाणार आहे. ठाणे शहरातील नागरिकांना श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहता यावा, यासाठी शहरातील १२ ठिकाणच्या मंदिराबाहेर भव्य एलईडी स्क्रीन लावून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्याचबरोबर १ लाख भाविकांना लाडूवाटप केले जाणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. २० जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राम मंदीराची प्रतिकृती असलेल्या रथाची मिरवणुक शहरात काढण्यात येणार आहे. तलावपाळी येथे आरती केली जाणार असून त्याचबरोबर या परिसरात दिवाळीप्रमाणेच विद्युत रोषणाई केली जाणार आहे. डोंबिवलीतही श्री गणेश मंदीर संस्थानतर्फे श्रीराम पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर श्री प्रभुरामांच्या जीवनावर अधारीत संगीत संध्या, दीपोत्सव व रामोपासना, आयोध्या उदघाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. -डोंबिवलीमधील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने राम मंदीर ते राष्ट्र मंदिर या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून डॉ उदय निरगुडकर हे व्याख्यान देणार आहेत.

शहरात मिरवणूक

ठाणे शहरातील श्री कौपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावपर्यत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक २० जानेवारी रोजी सायंकाळी काढण्यात येणार आहे. काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या सहयोगाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाण्याच्या विविध भागामध्ये सुशोभिकरण व विद्युत रोषणाई भव्य स्वरुपात करण्यात येणार असून मासुंदा तलाव येथे तरंगता रंगमंच आणि लेझर शो च्या माध्यमातून श्रीराम चरित्र उलगडण्यात येणार आहे. यावेळी प्रदुषणमुक्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. शिवाय, २२ जानेवारीला प्रत्येक शिवसेना शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.

आणखी वाचा-ठाकरे गटात पुन्हा मोठी फुट पडणार? शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे चर्चेला सुरूवात

आयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राममंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त अंबरनाथ तालुका अध्यात्मिक उत्सव समिती आणि आमदार किसन कथोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौकातील मराठी शाळेच्या पटांगणात १७ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान भव्य श्रीराम महोत्सव साजरा केला जाणार आहे. शहरातील अनेक संस्था या उत्सवात सहभागी झाल्या आहेत. याठिकाणी आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येईल. तसेच १७ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी ५ ते ९ दरम्यान भजन आणि श्रीराम गीतांचे कार्यक्रम होणार आहेत. प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात येईल. २२ जानेवारीला शहरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ढोल ताशे , बँड पथक घेऊन, चित्र रथ, प्रभू श्रीरामाची मूर्ती असलेला रथ असे या मिरवणुकीचे स्वरूप असणार आहे. त्यानंतर उल्हास नदीवर महाआरती होईल. आमदार किसन कथोरे यांनी संपूर्ण मतदार संघातील नागरिकांना २ लाख ५१ हजार सुबक नक्षीदार दिवे घरोघरी वाटले असून २२ जानेवारीला दीपोत्सव करण्याचे आवाहन केले आहे.

Story img Loader