वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या टँकरवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून १२ तास टँकरबंदी, एमआयडीसी प्रशासनाकडून तपासणी चौक्या तर सीसीटीव्ही लावण्याचे उपाय योजण्याचे ठरले होते. मात्र यापैकी एकही उपाययोजना कार्यान्वित झाली नसल्याने वालधुनी नदीपात्रात रासायनिक टंँकर रिते केले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. दोनच दिवसांपूर्वी कल्याण आणि उल्हासनगर शहराच्या वेशीवर सुज्ञ नागरिकांनी एक टँकर पकडला. त्यामुळे प्रदुषणाबाबत शासकीय संस्थांना गांभीर्य नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

हेही वाचा >>>ठाणे: ९९ लाख व्यवसायिकाच्या खात्यातून सुमारे एक कोटी रुपये गायब

anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Pimpri , Chikhli, scrap dealers in Chikhli,
पिंपरी : चिखलीतील अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Asangaon-Kasara local trips, local trains running late,
आसनगाव-कसारा लोकल फेऱ्यांमध्ये एक्सप्रेसचा अडथळा, लोकल गाड्या उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी
nagpur airport latest marathi news
नागपूर : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानसेवा बंद, काय आहे कारण?
Helmets are also mandatory for those sitting on back of two-wheeler
ठाणेकरांनो सावधान, आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती

गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये असलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे या भागात प्रदुषणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. त्याविरूद्ध वनशक्ती संस्थेने स्थानिक शासकीय संस्थंना सुरूवातीला राष्ट्रीय हरित लवाद आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात ओढले होते. त्याप्रकरणी राज्य शासनाने प्रदुषण रोखत दंड भरण्याची हमी दिल्याने स्थानिक एमआयडीसी, पालिकांना दिलासा मिळाला होता. स्थानिक औद्योगिक वसाहतींमधून त्यानंतरही अनेकदा प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाल्यात किंवा नदी सोडल्याचे समोर आले होेते. त्यातच आता पुन्हा एकदा रासायनिक सांडपाणी असलेले टँकर वालधुनी पात्रात सोडल्याचे दिसून आले आहे. दोनच दिवसांपूर्वी कल्याण आणि उल्हासनगर शहराच्या सीमेवर एक टँकर रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचे दिसून आले. वालधुनी नदी प्रेमींनी या टँकरची माहिती पोलिसांना दिली. मात्र या प्रकारानंतर आजही वालधुनी नदी पात्रात सर्रासपणे टँकर रीत केले जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात राष्ट्रीय हरीत लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानंतर विविध उपाययोजना येथे राबवणे आवश्यक होते.

हेही वाचा >>>ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहास तज्ज्ञांची समिती गठीत करा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

यात शहरात येणाऱ्या टँकरची तपासणी करण्यासाठी तपासणी चौक्या सुरू करण्याचे महत्वाचे काम होते. एमआयडीसीच्या वतीने उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावर या चौक्या बसवल्या. मात्र त्या सुरू करण्यात वर्षभरानंतरही एमआयडीसीला यश आलेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पोलिसांच्या वतीने डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात सायंकाळ ते सकाळी १२ तास टँकर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीची अंमलबजावणी होत नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. यापूर्वीही वालधुनी नदी किनारी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचेही आदेशही देण्यात आले होते. मात्र या कोणत्याही उपयायोजना करण्यात अद्याप शासकीय यंत्रणांना यश आलेले नाही. परिणामी प्रदुषणाच्या घटना थांबलेल्या नाही. प्रदुषणाच्या मुद्द्यावर शासकीय संस्थांना गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

Story img Loader