पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर भागात गुरूवारी मध्यरात्री एका कंटेनरमधून प्रोपेलिन ग्लायकोल हे रासायनिक द्रव्य सांडले. सुदैवाने हे रसायन ज्वलनशील नसल्याने दुर्घटना टळली. या घटनेमुळे रसायन वाहून नेणाऱ्या वाहन चालकांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. घटनेमुळे रात्रीच्या वेळेत मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ठाणे: दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात दुध बंदी; ‘या’मागण्यांसाठी दुध विक्रेत्यांचे शुक्रवारी दुध बंद आंदोलन

न्हावा शेवा येथून निघालेला हा रासायनिक कंटेनर गुरुवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गे गुजरातच्या दिशेने वाहतूक करत होता. हा कंटेनर कोपरी आनंदनगर येथे आला असता, कंटेनरचा अपघात झाला. त्यामुळे त्यातील प्रोपेलिन ग्लायकोल हे रसायन रस्त्यावर सांडू लागले. घटनेची माहिती कोपरी पोलीस, वाहतूक पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. हे रसायन औषध निर्मितीसाठी वापरले जात असून ते ज्वलनशील नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यामुळे दुर्घटना टळली. सध्या या मार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु रसायन सांडले त्यावेळेस या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemical spilled on eastern expressway thane news dpj