लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : ईडी, सीबीआय, आयकर विभाग या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना सतावून आपल्या पक्षात घेण्याचे काम भाजपा करत असल्याचे आम्ही सातत्याने सांगत होतो. मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले असून याचबरोबर भाजपची मानसिकताही समोर आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. शरद पवार यांना सोडून गेलेले आणि आता राज्यात मंत्री असलेले जवळपास सर्वचजण ईडीच्या जाळ्यात होते, असा दावाही त्यांनी केला आहे.
छगन भुजबळ हे ओबीसी असल्यानेच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली, असा दावा राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांचा हा दावा शंभर टक्के खरा आहे. ही बाब भुजबळांनीच सांगितलेली असल्याने भाजपचा जातवर्चस्ववादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.‘२०२४ -इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया’ हे राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक आहे. या पुस्तकातील मजकुरानुसार, वयाच्या ७५ व्या वर्षी आपण ईडीची कारवाई सहन करू शकत नव्हतो. म्हणून भाजपसोबत गेलो. आता सुखात आहे, असे छगन भुजबळ हे सरदेसाई यांच्याशी चर्चा करताना म्हणाले होते. भुजबळ हे आक्रमक नेते असल्याने ते सत्य बोलत आहेत. ईडी, सीबीआय, आयकर यांच्यामार्फत धमकावून विरोधकांना पक्षात घेण्याचे काम भाजपा करते. याबाबत शरद पवार यांनीही सांगितले होते आणि आम्ही सुद्धा हेच वारंवार सांगत आहोत. उद्धव ठाकरे यांनाही अनेकांनी हेच सांगून पक्ष सोडला आहे, असा दावा आव्हाड यांनी केला.
आता पक्ष फोडून जे मंत्री झाले आहेत. ते सर्वजण ईडीच्या जाळ्यात होते. हे सर्वजण मोठे कलाकार आहेत, असेही आव्हाड म्हणाले. छगन भुजबळ हे ओबीसी असल्यानेच त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली. ते तथाकथीत उच्च वर्णीय असते तर ही कारवाई झाली नसती, असे भुजबळ स्वतःच सांगत आहेत. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप हे जातीचे राजकारण करतात आणि त्यापेक्षा जातवर्चस्ववाद लढाई अधिक करतात. भाजपच्या या जात वर्चस्वाच्या लढाईत भुजबळांचा बळी गेला आहे. आपल्या देशात ८५ टक्के बहुजन आहेत. या बहुजनांवर भाजपचा राग आहे. त्यांना दलित, आदिवासी, ओबीसी नको असतात, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचा आधी दलितांवर रोष होताच आता ओबीसींवरही रोष आहे, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
डमी जितेंद्र आव्हाड सापडले नाहीत
जिथे पराभव दिसतो, तिथे भाजपचे लोक काहीही करतात. दिंडोरीमध्ये त्यांनी भगरे यांच्या नावाचा उमेदवार उभा केला होता. आता आपणांसमोरही जितेंद्र आव्हाड नावाचा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सबंध राज्यभर करण्यात आला होता. पण, त्यांना सापडला नाही. मला विचारले असते तर ठामपात काम करणारा एक जितेंद्र आव्हाड मी दिला असता, अशी कोपरखळी देखील जितेंद्र आव्हाड यांनी मारली.