ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे जे १२ किल्ले आहेत, त्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोस्कोमध्ये तसे नॉमिनेशन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीतील कार्यक्रमात बोलताना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे १२ किल्ले आहेत, त्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोस्कोमध्ये तसे नॉमिनेशन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या किल्ल्याचा लवकरच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देश आणि धर्म यासाठी मरण पत्करणारे संभाजी राजे यांना संगमेश्वरला ज्या वाड्यामध्ये अटक करण्यात आली होती. त्या वाड्याचाही आपण विकास करतोय.त्या ठिकाणी अतिशय छत्रपती संभाजी महाराजांचे आपण चांगले स्मारक करतोय. यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला विनंती केलेली आहे की, ज्या कोटीमध्ये छत्रपती शिवरायांना कैद करून ठेवले होते, त्याठिकाणी महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरीता परवानगी द्यावी आणि त्यासाठी बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे. इतकेच नव्हे तर पानीपतला ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होते आणि पानिपतच्या लढाईनंतर दहा वर्षांमध्ये महादजी शिंदे यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तक्तावर आपला भगवा झेंडा लावला होता. या ठिकाणीही स्मारक व्हावे असा आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.