ठाणे : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी केले जाणार नाही आणि इतर समाजांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका पहिल्या दिवसापासून राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. हीच भूमिका मंत्री छगन भुजबळ यांची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात स्पष्ट केले आहे. न्या. संदीप शिंदे समिती बरखास्त करण्यासंबंधी मंत्री भुजबळ यांनी केलेल्या विधानावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या मुहूर्त कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पाचपाखाडी, चंदनवाडी भागातील श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांना सदनिकेच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्याकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. आता रुग्णांना तुम्ही उत्तम सेवा द्यावी अशी माझी अपेक्षा आहे, असे शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्याकीय विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
india sets conditions for elon musk s starlink satellite licence approval
एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन

हेही वाचा >>>डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे नव्याने बेकायदा बांधकामाला सुरुवात, जुनाट झाडे तोडून पोहच रस्ता उपलब्ध नसताना बांधकामाला प्रारंभ

हेही वाचा >>>डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे नव्याने बेकायदा बांधकामाला सुरुवात, जुनाट झाडे तोडून पोहच रस्ता उपलब्ध नसताना बांधकामाला प्रारंभ

‘उद्धव ठाकरेंना टोला ’

काही लोकांना धर्मवीर सिनेमा खटकला, काही लोक सिनेमा बघता-बघता उठून गेले असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

ज्योतिषी थकले ’

लोकांचा विकास झाला पाहिजे. आनंद दिघे यांच्या विचारांतच सर्वदूर विकास होता. त्यामुळे आम्ही हे सगळे करतोय. सरकार स्थापन झाल्यापासून सगळे लोक सरकार पडणार, सरकार जाणार म्हणून ओरडत होते. आता हे ज्योतिषी थकले, कारण आनंद दिघे हे माझ्या पाठीशी उभे आहेत. आता म्हणायला लागले की मुख्यमंत्री बदलणार. परंतु सरकार अधिक मजबूत होत गेले.आता ३१ डिसेंबरला सरकार बदलणार असे सांगत आहेत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.