मुंबई : ठाणे महापालिकेत सुशोभीकरण तसेच विकास कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभागृहात आगमन होताच या सदस्यांनी तोंडावर बोट ठेवत गप्प बसणे पसंत केल्याचे चित्र दिसले. 

ठाणे शहरातील विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत कालिदास कोळंबकर आणि संजय केळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी या कामात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे सांगत भाजप सदस्यांची चौकशीची मागणी फेटाळली. या सर्व कामांचे त्रयस्थ यंत्रणेकडून लेखापरीक्षण करण्यात आले असून त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसल्याचे सामंत यांनी सांगितले. तर कोटय़वधी रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅक व विविध सुशोभीकरणाची विकासकामे निकृष्ट दर्जाची असून ठेकेदारांनी कामे न करताच देयके अदा केल्याचा आरोप संजय केळकर यांनी केला. या गैरव्यवहाराची चौकशी पालिकेतून नव्हे तर उच्चस्तरीय समिती नेमून करण्याची मागणी केळकर यांनी केली. या मागणीला ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनीही पाठिंबा दिला. चौकशीच्या मागणीवरून भाजप सदस्य आक्रमक झाले असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांचे सभागृहात आगमन झाले आणि काही क्षणांतच भाजप सदस्यांनी ही मागणी सोडून दिली.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

दरम्यान, मुलुंड क्षेपणभूमीतून ठाणे खाडीत सांडपाणी जात असून आणि एमआयडीसीतील कारखान्यांतून रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याचे पडसाद सभागृहात उमटले. ही खाडी कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल, यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आशीष शेलार यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून खाडीतील प्रदूषणाबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. याप्रश्नी स्थापन केल्या जाणाऱ्या समितीमध्ये निरीसारख्या संस्थेसह स्थानिक महापालिकांमधील तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी नमूद केले.

Story img Loader