ठाणे : ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय उद्धव ठाकरे यांचा दिवस गोड जात नाही. हिंदुत्वाला तिलांजली देऊन त्यांनी काँग्रेस पक्षाला मांडीवर घेतले. तेव्हाच त्यांचे बेगडी हिंदुत्व लोकांना समजले. त्यांचा हा मुखवटा आगामी लोकसभा निवडणुकीत जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये मोटार चालकाचा तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षासोबत घेतलेल्या बैठकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय उद्धव ठाकरे यांचा दिवस गोड जात नाही. हिंदुत्वाला तिलांजली देऊन त्यांनी काँग्रेस पक्षाला मांडीवर घेतले. तेव्हाच त्यांचे बेगडी हिंदुत्व लोकांना समजले. त्यांचा हा मुखवटा आगामी लोकसभा निवडणुकीत जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही. ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यांना मांडीवर घेणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व ज्यांनी सोडले, सत्तेच्या लालसेसाठी हिंदुत्वाचा विचाराला मतदान करूनही मतदारांचा विश्वसघात करून ज्यांनी असंगाशी संग केला. त्यांना आता जनताच जागा दाखवेल, असेही ते म्हणाले. घरी बसून काम करणाऱ्यांना नागरिक मत देत नाहीत. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन कितीही प्रयत्न केले. तरीही २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा बहुमताने निवडून येतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असेही ते म्हणाले.