लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मालवण येथील घटना दुर्दैवी आहे. परंतु त्यावर राजकारण करणे हे अधिक दुर्दैवी आहे. घरी बसलेले आता रस्त्यावर उतरत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे. जनता यांना कायमचे घरी बसवेल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष केली.

eknath shinde, Pratap Sarnaik,
साहेब असा अंगठा दाखवून चालणार नाही, निधी द्यायलाच लागेल; आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांसमोरच निधीची मागणी
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
dombivli railway police returned jewellery to woman forget in local train
लोकलमध्ये विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून दिव्याच्या महिलेला परत
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Crime against man who exposed his wifes immoral relationship on social media in Dombivli
डोंबिवलीत आजदेमधील पत्नीचे अनैतिक संबंध समाजमाध्यमात उघड करणाऱ्या पतीविरुध्द गुन्हा
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघातील विविध वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. ज्या व्यक्तीने पुतळ्याचे काम केले आहे, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा-ठाणे : लग्न जुळविणाऱ्या ॲपच्या माध्यमातून ओळख, अन् ९५ हजारांची फसवणूक

“मालवणमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण त्या घटनेचे राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे. जनता सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे. जे घरी बसले होते ते आता रस्त्यावर आले आहेत. करोनामध्ये, महापुरामध्ये यांनी नागरिकांना मदत केली असती तर नागरिकांनी त्याची आठवण ठेवली असती. मात्र, आता सर्व राजकारण आहे. पण जनता देखील सुज्ञ आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते यांना रस्त्यावर आणतील आणि कायमचे घरी बसवतील” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष केली.