कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी कल्याणमध्ये येत आहेत. आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते ऑनलाईन माध्यमातून काही प्रकल्पांचे लोकार्पण तर, काही कामांचे भूमिपूजन करतील. अत्रे रंगमंदिरात संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कल्याण मधील गौरीपाडा येथील सीटी पार्क, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पणानंतर नागरिकांसाठी खुली केली जातील. याशिवाय, केडीएमटी परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील नऊ विद्युत बस, विविध प्रकल्प बाधितांना सदनिकांचा ताबा, अमृत टप्पा दोन योजनेतून गौरीपाडा येथे ९५ दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणे, अग्निशमन केंद्र, क प्रभाग क्षेत्र इमारतीचे लोकार्पण या सोहळ्यांचा या कार्यक्रमांमध्ये अंतर्भाव आहे.

हेही वाचा : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या चालकाला अटक

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…

आधारवाडी येथील पालिकेच्या राखीव भूखंडांवर अग्निशमन मुख्यालय आणि केंद्र, क प्रभाग कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी प्रशासनाने १३ कोटी ६५ लाखाची तरतूद केली आहे. सीटी पार्क हे कल्याण-डोंबिवलीतील मनोरंजनाचे केंद्र असणार आहे. याठिकाणी मनोरंजन, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, ॲम्फी थिएटर, फूड प्लाझा सुविधा आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करून केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे केडीएमटी उपक्रमात २०७ विद्युत बस धावणार आहेत .या बसमधील नऊ बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. भारीत केंद्र सुरू झाल्यानंतर या बस प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.