नवी मुंबई – सध्याच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचे कर्णधार (कॅप्टन) आहेत. आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री तेच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी वाशी येथे बोलताना केला. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची १६ नोव्हेंबरला सभा

हेही वाचा – ठाणे : रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची लूट

प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटायलाच हवे, मला ही तसेच वाटते. मुख्यमंत्र्यांच्या नावे कोणताही पट्टा लागेल असे वागू नका महायुतीच्या उमेदवारांचेच काम करा असे आवाहनही त्यांनी बेलापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. एकशेदहा आमदार असतानाही भाजपाने आपल्याला मुख्यमंत्री केले. आज, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत म्हणून आपला रुबाब आहे. साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे जर आपल्याला वाटतं असेल तर, महायुतीचा उमेदवार ज्या कुठल्या पक्षाचा असेल त्यांचे काम करा असे आवाहन त्यांनी केले. जर तुम्ही चुकीचे काम कराल तर, पक्षात ठेवणार नाही हे याद राखा असा इशाराही त्यांनी दिला. माझाच नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी इच्छा प्रत्येक कार्यकर्त्यांनी बाळगा. असे ही ते यावेळी म्हणाले.