ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठपनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १११ फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली. यावेळी ढोल ताशे वाजवत रामाचा जयघोष करण्यात आला. अनेक जण ढोल ताशांच्या गजरावर थिरकत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध सायकल अगरबत्ती कंपनीने 23 दिवस सुगंध दरवळत ठेवणारी १११ फुटांची अगरबत्ती तयार केली. ही अगरबत्ती कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात उभारण्यात आली होती. चारकोल, जिगट, बांबू, चंदन पावडर, क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दशंगामध्ये मध, कोनेरी गेड्डे, तूप,चंदनाचे लाकूड पावडर, गुग्गुला, आगरू, सांब्राणी, देवदारू, लोबन आणि पांढरी मोहरी सोबत कोळसा, जिगट आणि गूळ,परमपारा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्यांनी अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. ही अगरबत्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-डोंबिवली, कल्याणमध्ये ‘रामोत्सव’, दीपोत्सव; विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, राम नामाचा गजर

कौपीनेश्वर मंदिरात प्रज्वलित होणारी अगरबत्ती १८ कारागिरांनी २३ दिवसात तयार केली. ही अगरबत्ती २३ दिवस ५०० मीटरपर्यंत सुगंध पसरविणारी आहे. ही अगरबत्ती मैसूर येथे तयार करून ती मंदिराच्या आवारात आणण्यात आली, अशी माहिती सायकल अगरबत्ती कंपनीचे ब्रँड पार्टनर दानिश शेख यांनी दिली. महाआरती पूर्वी ही अगरबत्ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde lite up 111 feet incense stick in thane mrj
Show comments