लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कोपीनेश्वर या प्राचीन मंदिरात सोमवारी सकाळी शिवसेनेकडून आयोजित महाआरतीच्या निमित्ताने रामउत्सवाचा जल्लोष दिसून आला. याठिकाणी सकाळपासूनच रामभक्त पारंपारिक वेशात मोठ्या संख्येने जमले होते. ढोल-ताशे आणि बँजोच्या गजरात खांद्यावर श्रीरामाचे मफलर घेऊन भक्तांकडून रामाचा जयघोष सुरू होता. या उत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावून त्यांनीही जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या आणि त्यास भक्तांनी प्रतिसाद दिल्याने परिसरातील वातावरण राममय झाले होते.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
Girish Mahajan Radhakrishna Vikhe-Patil Dhananjay Munde Dada Bhuse have less important cabinet post
ज्येष्ठ मंत्र्यांना धक्का! महाजन, विखे-पाटील, मुंडे यांचे पंख छाटले
narendra modi
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन
Loksatta chadani chowkatun Rajya Sabha Prime Minister Narendra Modi Constitution Amit Shah
चांदणी चौकातून: कुठं आहे ती राज्यसभा?
463rd Sanjeev Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj concluded
पिंपरी : पुष्पवृष्टी, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, महापूजा आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कोपीनेश्वर या प्राचीन मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन सोमवारी सकाळी करण्यात आले होते. गुढी पाडव्याच्या दिवशी कोपीनेश्वर मंदीर येथून मिरवणुक काढण्यात येते. त्यादिवशी मंदीरात जसे वातावरण असते, तसेच काहीसे वातावरण सोमवारी महाआरतीच्या निमित्ताने दिसून आले. मंदीरात सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आलेली होती. रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. आयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा महासोहळा रामभक्तांना पहाता यावा, यासाठी मोठा पडदा लावण्यात आला होता. त्यावर आयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्यात येत होते.

आणखी वाचा-दिवंगत आनंद दिघे यांच्या आश्रमातील लॉकर सीबीआयच्या पथकाने उघडले आणि…

सोमवार सकाळपासूनच कोपीनेश्वर मंदीरात रामभक्त पारंपारिक वेशभुषेत जमण्यास सुरूवात झाली. खांद्यावर श्रीरामाचे मफलर घेऊन भक्तांकडून रामाचा जयघोष सुरू होता. ढोल-ताशे आणि बँजोच्या तालावर अनेक भक्त थिरकत होते. महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आणि त्यांनी रामभक्तांसोबत आयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पाहिले. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या आणि त्यास भक्तांनी प्रतिसाद दिल्याने परिसरातील वातावरण राममय झाले होते. परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

महाआरती आणि १११ फुटी अगरबत्ती

ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १११ फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली. प्रसिद्ध सायकल अगरबत्ती कंपनीने २३ दिवस सुगंध दरवळत ठेवणारी १११ फुटांची अगरबत्ती तयार केली आहे. चारकोल, जिगट, बांबू, चंदन पावडर, क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दशंगामध्ये मध, कोनेरी गेड्डे, तूप,चंदनाचे लाकूड पावडर, गुग्गुला, आगरू, सांब्राणी, देवदारू, लोबन आणि पांढरी मोहरी सोबत कोळसा, जिगट आणि गूळ,परमपारा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्यांनी अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. ही अगरबत्ती १८ कारागिरांनी २३ दिवसात तयार केली. ही अगरबत्ती २३ दिवस ५०० मीटरपर्यंत सुगंध पसरविणारी आहे. ही अगरबत्ती मैसूर येथे तयार करून ती मंदिराच्या आवारात आणण्यात आली आहे. ही अगरबत्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही अगरबत्ती प्रज्वलित केल्यानंतर महाआरती केली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा-डोंबिवली, कल्याणमध्ये ‘रामोत्सव’, दीपोत्सव; विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, राम नामाचा गजर

मनसेकडून आरती

राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्यानिमित्ताने मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनीही कोपीनेश्वर मंदीरात सोमवारी सकाळी आरती केली. तसेच याठिकाणी लाडूचे वाटप केले.

Story img Loader