ठाणे : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत, असे सांगत आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. त्यांचे शिवसेनेच्या संपत्तीवर केवळ प्रेम आहे. पण, मला संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दसरा मेळावा तयारी, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी ठाण्यात आयोजित केला होता. या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, संपर्क प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी, नेते, उपनेते उपस्थित होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मागील दसरा मेळाव्याच्या वेळेस आपल्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नव्हते. पण निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत. पण, गेल्या महिन्यात शिवसेनेच्या खात्यामधले पैसे ५० कोटी रुपये मागण्याचे पत्र माझ्याकडे आले आणि मी लगेच पैसे द्यायला सांगितले. कारण ही शिवसेनेची संपत्ती आहे आणि त्यांचे प्रेम केवळ त्यावरच आहे. मला संपत्तीचा मोह नाही, हे आधीच सांगितले आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बेईमानी आणि विश्वासघात हा २०१९ मध्येच झाला, त्यामुळे त्यांच्याकडून काही आणखी अपेक्षा नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.