डोंबिवली : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहर परिसराच्या विकासासाठी अनेक घोषणा आणि विकास निधी जाहीर केला. या घोषणा होत असताना नेहमीच विकास कामांसाठी व्याकुळ आणि तहानलेले विकसित दिवा गाव आणि परिसराकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा हद्दीत विकास कामे करताना किमान राजकीय वादाचे घोंगडे या भागात भिजत घालू नये. दूरदृष्टीने या भागाचा विकास करावा, असे या भागातील रहिवाशांचे मत आहे.

कल्याण ग्रामीणचे मनसेचे आ. प्रमोद पाटील यांनीही ठाण्यासाठी विकासाची पॅकेज देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर टी्वट करुन टीका केली आहे. तसेच धनाढ्य विकासकांच्या १० गाव हद्दीतील रस्ते कामे एमएमआरडीएने हाती घेतल्याने टीका केली आहे.

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi for spreading chaos in India print politics news
‘भारत जोडो’तून अराजक पसरवण्याचे काम; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका
Seven developers application to government for withdrawal from SEZ project print eco news
सात विकासकांचा ‘सेझ’ प्रकल्पातून माघारीचा सरकारकडे अर्ज; पुणे, नागपूरच्या प्रकल्पांचाही समावेश

घरे घेतली सुविधांचा अंधार

दिवा गावा जवळील आगासन गाव हद्दीत रविवारी रात्री दुचाकी वरुन खड्ड्यात पडल्याने अंगावरुन टँकर गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. दिवा, आगासन, शीळ परिसरातील गावे हा कल्याण डोंबिवली पालिका आणि ठाणे पालिका हद्दीतील नव्याने विकसित होत असलेला भाग आहे. या परिसरात नवीन गगनचुंबी गृहसंकुले उभी राहिली आहेत. नवी मुंबई, ठाणे, पनवेल, मुंबई भागात कामाच्या ठिकाणी झटपट वाहनाने जाता यावे या उद्देशाने नागरिकांनी या भागातील गृहसंकुलातील घरांना पसंती दिली आहे. कोट्यवधीचा महसूल या गृहसंकुलांमधून कराच्या रुपाने पालिका, शासनाला मिळत असताना दिवा परिसरातील रहिवाशांवर पालिका, शासन अन्याय का करत आहे, असे प्रश्न या भागातील नागरिकांनी केले.

हेही वाचा… खड्ड्याने घेतला आणखी जीव, डोंबिवली जवळील आगासन गावात खड्डा चुकविताना तरुणाचा मृत्यू, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची सरकारवर टीका

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासन, ठाणे पालिकेने, कल्याण डोंबिवली पालिकांनी आपल्या हद्दीतील या दिवा, घारीवली, आगासन, शीळ, भोपर, संदप, उसरघर भागातील रस्ते सुस्थितीत केले पाहिजेत. नवीन गृहसंकुलांमुळे या भागात वस्ती वाढली आहे. त्या प्रमाणात वाहने वाढली आहेत. सामान्य, मध्यवर्गिय कुटुंबीयांनी दिवा भागातील घरांना पसंती दिली आहे. या भागात बेकायदा इमारती, चाळींची बांधकामे अधिक संख्येने आहेत. मुंबई, नवी मुंबई भागातील चाळी, झोपडपट्टी भागातील अनेक रहिवाशांनी कमी किमतीत घरे म्हणून दिवा परिसरातील बेकायदा बांधकामांमध्ये घरे घेणे पसंत केले आहे. त्यामुळे नोकरदार वर्गा बरोबर कष्टकरी, मजुर वर्गाची दिवा, आगासन भागातील वस्ती वाढली आहे. हा सगळा भार दिवा रेल्वे स्थानक, कल्याण-शिळफाटा रस्त्यावर येत आहे, असे नागरिकांनी सांगितले.

विकास कामे दुर्लक्षित

वाढत्या वस्ती बरोबर या भागात पाणी, रस्ते, पथदिवे ही कामे प्राधान्याने होणे आवश्यक आहे. या भागातील बेकायदा बांधकामे रोखली नाहीतर त्याचा परिणाम अधिकृत वस्तीत राहणाऱ्यांना रहिवाशांच्या नागरी सुविधांवर होणार आहे. त्यामुळे ही कामे रोखण्यासाठी ठाणे पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली. दिवा पूर्व रेल्वे स्थानक भागात तिकीट खिडकी नाही. स्थानकात पाण्याची समस्या आहे. कोकणातील नागरिक, लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकातून सुटतात. त्यांच्या सोयीसाठी येथे पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे दिवा जंक्शन असले तरी अनेक समस्या या स्थानकात आहेत. त्या मार्गी लावणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांनी केली.

हेही वाचा… ठाणे : १ लाख ४० हजार गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना

खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा रेल्वे स्थानक, दिवा गाव भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या सुविधा फक्त दिवा गाव पुरत्या मर्यादित आहेत, असे रहिवाशांनी सांगितले. परिसरातील गावे, तेथील रस्ते, पाणी, पथदिवे या समस्या या भागात कायम आहेत. या भागाचे पालकमंत्री असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सर्वोच्च पदावर असल्याने आणि त्यांचे पुत्र खा. शिंदे या भागाचे नेतृत्व करत असल्याने दिव्याचा नेहमीच विकास कामांच्या बाबतीत अंधारात असलेला भाग आता उजेडात आणण्याचे काम करावे आणि या भागाला दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केवळ मनसे आमदाराच हा भाग म्हणून त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले तर त्याचे चटके दिवा परिसरातील नागरिकांना बसणार आहेत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

आ. प्रमोद पाटील यांनीही कागदोपत्री कामे करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामे करुन मग त्याची फलकबाजी करा आणि त्याचे श्रेय आम्ही पण तुम्हालाच (शिवसेना) देऊ, अशी भूमिका यापूर्वीच घेतली आहे. आगासन गावातील खड्डे मृत्यूवरुन आ. पाटील यांनी नामोल्लेख टाळुन मुख्यमंत्री, खासदार यांनाच लक्ष्य केले आहे.