कल्याण- येथील पश्चिमेतील गांधारे भागातील एका सोसायटीच्या उद्वाहनाच्या खड्डयात पडून एका तेरा वर्षाच्या मुलाचा बुधवारी मृत्यू झाला. मयत मुलगा याच भागातील एका लाॅन्ड्रीवाल्याचा मुलगा होता.हिमांशु कनोजा (१३) असे मयत मुलाचे नाव आहे. गांधारे भागातील रिध्दी सिध्दी सोसायटीत ही दुर्घटना घडली आहे. रिध्दी सिध्दी सोसायटी परिसरात एका लाॅन्ड्रीवाला आहे. रिध्दी सिध्दी सोसायटीतील काही रहिवाशांचे इस्त्री केलेले कपडे परत करण्यासाठी लाॅन्ड्री चालकाने आपला मुलगा हिमांशु याला बुधवारी संध्याकाळी सहा वाजता पाठविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुटुबियांना कपडे दिल्यानंतर हिमांशु सोसायटीतील उद्वाहनाने खाली येत होता. त्यावेळी पाचव्या आणि सहाव्या माळ्याच्या मध्ये काही तांत्रिक बिघाड होऊन उद्वाहन थांबले. आता आपण उद्वाहनमध्ये अडकलो या भितीने हिमांशुने चालू उद्वाहनचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात उद्वाहन सुरू होऊन ते खाली जाऊ लागले. उद्वाहनातून बाहेर येण्याच्या गडबडीत हिमांशु तोल जाऊन उद्वाहन खालील खोल खड्ड्यात सहाव्या माळ्यावरुन पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा >>>वाहन बंद पडल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडी

सहा वाजता रिध्दी सिध्दी सोसायटीत कपडे देण्यासाठी गेलेला मुलगा घरी येत नाही म्हणून लाॅन्ड्री चालकाच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांना मुलगा उद्वाहनच्या खड्ड्यात पडले असल्याचे समजले.त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.