किशोर कोकणे

ठाणे : ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका शासकीय संस्थेमार्फत २१ वर्षीय मुलाला ठाणे मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलाच्या आई-वडिलांबाबतची कोणतीही माहिती रुग्णालय  प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. परंतु मनोरुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या ‘आधारकार्ड’ बनविण्याच्या उपक्रमामुळे या तरुणाला त्याचे कुटुंब पुन्हा मिळाले आहे. मुलाला पाहताच वडिलांचे अश्रू अनावर झाले होते.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…

नवी मुंबई येथील राज्य शासनाच्या भिक्षागृहामध्ये असलेल्या एका २१ वर्षीय मुलाला न्यायालयाच्या आदेशानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानुसार या तरुणावर मागील तीन महिन्यांपासून मनोरुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या रुग्णालयातील रुग्णांचेही आधारकार्ड बनविले जावे असा उपक्रम प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नेताजी मुळीक यांनी सुरू केला आहे. त्यानुसार, कापूरबावडी येथील आधार केंद्राचे प्रमुख कॅप्टन चंद्रादेव यादव आणि त्यांच्या पथकामार्फत रुग्णालयातील मनोरुग्णांचे आधारकार्ड बनविले जात आहे. त्यानुसार, २१ वर्षीय तरुणाचेही शुक्रवारी सकाळी आधारकार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा >>> ठाणे : अंतरिम जामीन मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

आधारकार्ड बनविताना त्याच्या बोटांचे ठसे घेतले जात होते. परंतु आधारकार्ड यंत्रणेत यापूर्वीच या तरुणाचे आधारकार्ड बनल्याचे दर्शविले जात होते. त्यामुळे चंद्रादेव यादव यांनी याची माहिती आधार केंद्राच्या प्रादेशिक कार्यालयात दिली. तेथील अधिकाऱ्यांनी तपासणी करून तरुणाच्या आधारकार्डची माहिती यादव यांना दिली. यादव यांना तरुणाच्या आधारकार्डवर एक मोबाईल क्रमांक प्राप्त झाला. त्यांनी तात्काळ त्या क्रमांकावर संपर्क साधला. तो क्रमांक तरुणाच्या वडिलांचा असल्याचे समोर आले. तसेच मुलगा वर्षभरापासून बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत त्रिमूर्तीनगर मधील चोरट्यांचा धुमाकूळ, दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी

यादव यांनी तात्काळ त्यांना मनोरुग्णालयात बोलावले. मुलाचे वडिल रुग्णालयात येताच मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले होते. डाॅक्टरांनी त्यांच्याकडील प्रमाणपत्र तपासून त्या मुलाला वडिलांच्या ताब्यात दिले. हा तरुण मुंब्रा येथे आई-वडिल आणि दोन भावंडांसोबत राहत होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये तो घरातून बाहेर पडल्यानंतर अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी परिरात त्याचा शोध घेतला. तसेच पोलीस ठाण्यातही तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

मनोरुग्णांची ओळख पटविण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला होता. त्याला यश येत आहे. वर्षभरानंतर मुलाला भेटल्यामुळे वडिल भावनिक झाले होते.

-डाॅ. नेताजी मुळीक, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे.

Story img Loader