कला हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकला विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच एखादी कला अवगत असणे फार गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात कलेमुळे चित्त स्थिर होण्यास मदत होते. संगीताच्या सप्तसुरांमुळे एकाग्रचित्त होण्यास मदत होते. नृत्यामुळे ऊर्जा वाढते आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. तर चित्रक लेमुळे भावभावनांचा खेळ अगदी सहज उलगडता येते. अशाच एका दी आर्ट वर्कशॉप या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा आंबेडकर सभागृह डोंबिवली पूर्व येथे भरविण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये ५ ते १२ वर्षांच्या वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. या शिबिरात एक संहिता तयार करण्यात आली आहे. यामध्ये विविध कलेचा समावेश आहे. संगीताचे प्रशिक्षण क्षितिजा जोशी देणार असून त्यांनी डोंबिवली येथील मधुवंती दीक्षित यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. सध्या वर्षां भावे यांच्याकडून त्या प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये तबला-ढोलकी वादनाची ओळखही विद्यार्थ्यांना करून देण्यात येईल. तबला व ढोलकीची ओळख करून देण्यासाठी तबलावादक रोहन पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर भरतनाटय़म, कथक आणि अभिनयाचे धडे कृतिका सावंत देणार असून त्यांना भरत नाटय़म् या कलेमधून पदविका पूर्ण केला आहे तर अभिनय क्षेत्रात विद्यापीठाच्या स्पर्धेमधून रौप्यपदक पटकाविले आहे. याचबरोबर सोफीया महाविद्यालयातून कमर्शिअल आर्ट्स पूर्ण करणाऱ्या स्नेहा इनामदार या क्राफ्ट आणि चित्रकलेचे धडे या विद्यार्थ्यांना देणार आहेत. या वर्कशॉपमुळे लहान मुले आणि कलेची गट्टी जमणार आहे. आपल्यातील उत्तम कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अशा शिबिरांचा मुलांना फायदा होत असल्याचे स्नेहा इनमादार यांना सांगितले. शिबिराच्या पाच दिवसांत विद्यार्थी जे काही शिकणार आहेत त्याचे सादरीकरण शिबिराच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थी पालकांसमोर करून दाखविणार असून काही अभिनेतेही या शिबिराला हजेरी लावणार आहेत. या एकाच शिबारात अनेक कलांची ओळख होणार असून चिमुकल्या डोंबिवलीकरांना सर्व कला जाणून घेण्याची ही संधी आहे.

Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Marathi Singer Arvind Pilgaonkar career information in marathi
व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
  • कधी- समोवार,२३ ते २८ मे, वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ५
  • कुठे- आंबेडकर हॉल, रेल्वेस्थानकाजवळ, डोंबिवली (पूर्व)

Story img Loader