ठाणे : कापूरबावडी आणि माजीवडा चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चक्राकार पद्धतीने वाहतूकीचे नियोजन करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या चौकात मार्गिका निश्चित करुन वाहतूक बेट तयार केले जाणार आहे. तसेच पुलाखाली थांब रेषा तसेच इतर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथे करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचा आढावा शुक्रवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी संयुक्त पाहणी दौऱ्यात केला. या दौऱ्यात माजिवडा आणि कापूरबावडी जंक्शन या ठिकाणी वाहतूक मार्गिका निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक वाहतूक बेट विकसित करून त्याची अमलबजावणी करण्याची सूचना आयुक्त बांगर यांनी दिली. त्यानंतर पुलाखाली थांबरेषा तसेच इतर उपाययोजना केल्या जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. यावेळी एलबीएस मार्गाचीही पाहणी अधिकाऱ्यांनी केली.

Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
sarva karyeshu sarvada sane guruji rashtriy smarak trust information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
New bridge, Kharghar, traffic, Kharghar bridge,
खारघर येथील नवा पूल वाहतुकीसाठी खुला
pune police ganeshotsav marathi news
गणेशोत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष केंद्र; प्रथमच अशी व्यवस्था
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
Youth murder, hotspot, Hadapsar area,
पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना

हेही वाचा >>> रस्ते कामांचे लेखापरिक्षणानंतरच कंत्राटदारांना देयके द्या; ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

अपलॅब चौकात रस्त्याचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. तेथे मेट्रो मार्गिकेच्या खांबाभोवती छोटेखानी वाहतूक बेट तयार करण्याचे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले. त्यामुळे पुलाखालील भागाचे सौंदर्यीकरण होईल आणि वाहतूकीचे परिचलनही व्यवस्थित होईल असा दावा महापालिकेने केला. कापूरबावडी नाका, माजिवडा नाका येथील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागांवर गर्दुल्ल्यांचा वावर असतो. तसेच अनधिकृत वाहनेही उभी केली जातात. त्यास आळा बसवा यासाठी अधिकृत वाहनतळ केले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरून घोडबंदर मार्गावर जाणाऱ्या अवजड वाहनांना कॅडबरी जंक्शन पुलाखालून उजवे वळण देण्यात आले आहे. या बदलामुळे माजिवडा जंक्शनवरील अवजड वाहनांचा ताण कमी झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. असे असले तरी कॅडबरी जंक्शन येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.