‘उठ डोंबिवली जागी हो, हक्कासाठी सिध्द हो’ घोषणांनी परिसर दुमदुमला

डोंबिवली- दुरवस्था झालेले रस्ते, खड्डे, वाहन कोंडी आणि इतर नागरी समस्यांनी त्रस्त डोंबिवलीतील जागरुक नागरिकांनी गुरुवारी रात्री फडके रस्त्यावरील आप्पा दातार चौकात कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत उत्स्फूर्त आंदोलन केले. राजकीय पक्ष विरहित या आंदोलनात डोंबिवलीतील विविध भागातील नागरिक सहभागी झाले होते.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
NSUI, urban naxalites, students rights, NSUI latest news,
हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी नक्षली ठरवण्याचा प्रयत्न – एनएसयूआय

काही नागरिकांनी आंदोलनात सहभागी न होता घरबसल्या घरातील, व्यापाऱ्यांनी दुकानातील विजेचे दिवे रात्री आठ ते ८.०५ या वेळेत बंद करुन निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला. सुमारे २०० हून अधिक नागरिक यावेळी उपस्थित होते. ‘केडीएमसी हाय हाय, आमच्या टॅक्सचे होते काय’, केडीएमसी मुर्दाबाद, नागरी एकता जिंदाबाद, केडीएमसी सुस्त आहे, नागरिक त्रस्त आहेत, ‘गली गली मे शोर है केडीएमसी चोर है,’ ‘हक्क आहे, हक्क आहे, चांगले रस्ते, हक्क आहे, उठ डोंबिवली जागी हो, हक्कासाठी सिध्द हो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ‘डोंबिवलीचे खड्डे जगात भारी’ नाममुद्रा असलेले टी शर्ट घालून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी घंटानाद, थाळीनाद करण्यात आला.

भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे मतदार असलेले पण शहरातील नागरी समस्यांच्या विषयावर एक झालेले अनेक मतदार नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मागील तीन वर्षांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. माजी शहर अभियंता सपना कोळी यांनी महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी खड्डेमय रस्त्यांमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. याविषयी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन उदासीन असल्याने नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागते. पालिकेत अडीच वर्ष नगरसेवक राजवट नाही. त्याचा गैरफायदा आता प्रशासकीय कारकिर्दीतील अधिकारी घेत आहेत. खड्डे विषयांवर गेल्या तीन महिन्यांपासून विविध प्रकारची आंदोलने सामाजिक, नागरी संस्था करत आहेत. कडोंमपा हद्दीत खड्ड्यांमध्ये पडून आतापर्यंत पाच नागरिकांचा जीव गेला आहे. रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेने सुमारे २२ कोटीचा निधी प्रस्तावित केला असताना रस्त्यांची दुरवस्था का झाली असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित करुनही त्याचे उत्तर अधिकारी देत नाहीत. खड्डे विषयावर प्रशासन उदासीन असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीतील जागरुक गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाच्या विरुध्द मोहीम चालवित होते. या मोहिमेचे रुपांतर आंदोलनात झाले.

या आंदोलनात राजकीय व्यक्ति सहभागी होणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. आंदोलनाच्या बाजुला मनसेचे कार्यालय होते. नागरिकांचे आंदोलन असल्याने मनसे कार्यालयातील विजेचे दिवे निषेधासाठी कार्यकर्त्यांनी बंद ठेवले होते.

अशाप्रकारचे बिगर राजकीय तरुणांचे आंदोलन अधिक भव्य स्वरुपात शहरात उभे राहिले तेव्हा प्रशासन, शासनाचे डोळे उघडतील. नागरी समस्या मार्गी लागतील, अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिल्या. नागरी समस्यांनी सुमारे ७०० हून नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाला ईमेल पाठवून डोंबिवली शहर दत्तक घेण्याचे आवाहन केले आहे. ११ हजार सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

‘डोंबिवली, कल्याणमध्ये अनेक नागरी विकासाची कामे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू आहेत. रस्ते सुस्थितीत केले जात आहेत. त्यामुळे वीज बंद करुन काही विघ्नसंतोषी डोंबिवलीची बदनामी करत आहेत. त्यांना विकासाची दृष्टी नाही,’ अशी टीका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे युवा पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी येथे केली होती. त्यांच्या या विधानावर डोंबिवलीतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विघ्नसंतोषी, गावची बदनामी करणारे असे म्हणाऱ्यांनी पालिकेत राहून किती विकास कामे केली. असे बोलणारे त्यांच्या वरिष्ठांविषयी नागरिकांमध्ये रोष निर्माण करत आहेत. त्यांचे वरिष्ठ त्यांना या विषयात मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा करूयात, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

Story img Loader